पर्यावरण क्षेत्र

वृक्षवाढदिवस उत्सव

गेली २० वर्षे सातत्याने साजरा होणारा अनोखा उत्सव

उपक्रमाबद्दल

वृक्षवाढदिवस उत्सव हा संजीवनी परिवाराचा सर्वात अनोखा उपक्रम आहे. लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना गेली २० वर्षे सातत्याने सुरू आहे. झाडांशी भावनिक नाते जोडणे आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेणे हे या उत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे.